Monday, August 3, 2020

Nisarga Gan

निसर्ग संगीत..

गर्द निळ्या आभाळात
हिमवर्खी नभ दाटले
पर्वत शिखरांवरून थोडे
हिम घसरत आले

गर्द हिरवे काच पाणी
आरस्पानी नितळ झाले
डोकावून वृक्ष फुलांनी
रूप जणू न्याहाळिले

रक्तवर्णी लाल कुसुमे
जीवन तृष्णा होऊन सजले
हिरवाईने नटला परिसर
निसर्ग कंठी गान फुलले.

डॉ सदानंद चावरे
४-८-२०२०


No comments:

Post a Comment