दूर क्षितीज रेषेला...
दूर क्षितीज रेषेला
जरा थांबले आभाळ
निळ्या निळाईत
होते सारेच विलीन
निश्चळ जळ
स्तब्ध तसेच आकाश
दूर एकटेच दिसे
प्रकाशाचे एक बेट
नभ दाटले आकाशी
विखुरले पसरले
पंख कोणत्या परीचे
नभी विहरत आले
डॉ सदानंद चावरे
पारदर्शिका:- तुषार गणपुले
१६-८-२०२०
No comments:
Post a Comment