Thursday, August 6, 2020

सूर्योदय

तेजाळले गगन सारे
सुवर्ण गोल उजळता
उजळली पाने फुले
नवरसाने झळाळता

फाकली अशी प्रभा
सुवर्ण कण उसळले
कोंडला तिमीर निमाला
पसरता नभी किरण फुले

सूर्य बिंबी दाटलेले
चैतन्य ये नभांतरी
प्रभात क्षण किरणोत्सवी
आभा फाके हृदयांतरी

डॉ सदानंद चावरे
७-८-२०२०
 

No comments:

Post a Comment