राधाकृष्ण...
राधा समजायला म्हटलं तर सोपी
म्हटलं तर खूप कठीण.
ती त्याची गुरू होती
ती त्याची सखी होती
त्याच्यासाठी झुरणारी
त्याची प्रिया होती
यौवनाच्या पहाटे भेटलेली
अभिसारिकाही होतीं
त्याच्या हृदयाचं स्पंदन
जाणारी मैत्रीणही होती.
आयुष्यभर त्याची वाट पहाणारी
अलौकिक भक्तही होती.
विरहाची व्यथा जिरवणारी
महान योगिनी होती.
त्याची राणी नव्हती तरी
हृदय स्वामिनी होती
खरंच राधा कृष्णाची
नक्की कोण होती?
© डॉ सदानंद चावरे
१२-८-२०२०
छानच!
ReplyDeleteNice poem:Mangesh
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete