Sunday, August 16, 2020

लाटेवर होऊनि स्वार

उसळती फेसाळती
खळाळती लाटा
स्वार होऊन त्यांवरी
धुंडाळते वाटा

फुंफाटले सुसाट
वेगे मी आरुढ
आव्हान पेलताना
मनी नाही हुरहुर

तळ लाटेचा क्षणात
क्षणी लाट ये पायात
आहे मलाच माझ्या
सागराचे आमंत्रण

© डॉ सदानंद चावरे
१६-८-२०२०

No comments:

Post a Comment