Tuesday, August 11, 2020

कृष्ण

कृष्ण...

प्रत्येकाला जसा भावला
तो कृष्ण निराळा होता

देवकीचा प्यारा बछडा
यशोदेचा नंद लाला

गोप गोपींचा साथी
राधेचा हृदय दुलारा

द्रौपदीचा  प्रियतम भ्राता 
रुक्मिणीचा प्रियकर झाला

मित्रांशी सख्यत्वे रमला
दुष्टांचा संहारक ठरला

विदुराचा होई पाहुणा
पांडवांचा संरक्षक मोठा

जाणुनी आतुनी सारेकाही
निर्विकल्प निर्लिप्त उरला

कृष्णाने सहज व्यापिला
पैस केवढा  मोठा होता

आदी अंत तयाचा
कधी कुणा आकळला

डॉ सदानंद चावरे
११-८-२०२०


No comments:

Post a Comment