स्वप्नं...
स्वप्नांचं बरं असतं
मुक्त मोकळं होता येतं
स्वप्नांनाही रंग असतात
भावनांचे कढ असतात
स्वप्नांचं आपलं जग असतं
स्थल कालाचं बंधन नसतं
काही स्वप्नं विरुन जातात
काही खोल मूळ धरून रुजतात
काही स्वप्नं तात्कालिक
काही स्वप्नं सार्वकालिक
स्वप्नांनाही आशय असतो
अंतर्मनात उमटणारा नाद असतो
स्वप्न ओंजळीतल्या फुलासारखी
प्रवाहा बरोबर वाहात जाणारी
स्वप्न पिढ्यानुपिढ्या जपलेली
काळाचा प्रवाह थांबवणारी.. .बदलणारी.
डॉ सदानंद चावरे
६-८-२०२०
मित्र सदा अतिशय सुरेख काव्य. अशीच सदा आनंद देणारी सदा बहार काव्य करत जा.
ReplyDelete