Saturday, August 8, 2020

सांजवेळ

स्तब्ध जळ हे
स्तब्ध क्षण हा
आसमंत ही
विसावलेला

सांजवेळ की
उष:काल हा
संधिकाल हा
सजलेला

प्रशस्त डोंगर
सैलावले की
निसर्ग थोडा
सुखावलेला

जीवन नौका
जळी दिसतसे
तळात काही
गवसलेला

डॉ सदानंद चावरे
८-८-२०२०

No comments:

Post a Comment