जाळे.....
मीच विणतो माझ्यासाठी,जाळे अनंत धाग्यांचे,
कधी गुंततो गुंत्यामध्ये,धागे माझ्या स्वप्नांचे
थेंब दवाचे जल बिंदूंचे, अवघे चमचमिती,
दृष्टीभूल ही मजला भासे,माझ्याच आभासांची.
मला भासते मीच निर्मितो,विश्व माझे माझे,
जेव्हा कळते सत्य मजला, जाळे अवघे विरून जाते.
पारदर्शिका :- डॉ. महेश मोने
सदानंद, फोटो इतकीच उत्तम कविता
ReplyDelete