Tuesday, October 5, 2021

चित्र कविता

पानावरुनी पानावरती
टिप टिप थेंब पडे.
थेंबांची रांग लागली
मोत्यांची जणु माळ गमे.

सगुण मेळविता मेळवुनी
वृत्तीचे जणु घडती चिरे.
भ्रमरापरी मकरंद सेवुनी
आयुष्या आकार मिळे.

डॉ सदानंद अरुण चावरे
५-१०-२०२१
फोटो :- श्री. सुनील मनोहर गोडबोले.

No comments:

Post a Comment