अभ्यास...
अभ्यास एक ध्यास असतो
अंतरीचा श्वास असतो.
अज्ञाताचा शोध असतो
झुळझुळणारा बोध असतो.
शब्द नेमका वाचावा
अर्थ जाणून घ्यावा
विचार समजून यावा
भाव अंतरी उमटावा.
अभ्यास विषय निवडावा
प्रतिदिन विवरीत जावा
जाणतेपणी उलगडावा
स्वानंद उत्सव घडावा.
बुद्धी समाधान पावते
आनंदे हृदय परिमळते
उन्नयन वृत्तीचे घडते
अभ्यासे साधत जाते.
डॉ सदानंद चावरे
६-१०-२०२१
No comments:
Post a Comment