रंग मावळतीचे...
मावळतीचे ऊन डोकवी ,पट अभ्रांचा हलवुनी
दाटून येई अंधाराची,साय सावली नभांतरी.
काळोखाची आभा दाटली,दूर डोंगरी कपारीतुनी
विरघळती जणु तमोसागरी, अस्तित्वाच्या खुणा जरी.
निरोपाचे सूर तरळती, खोल मनाच्या कुपीतुनी
उगाच आळवी वेडा कोणी,आर्त व्याकुळ स्वरातुनी.
पारदर्शिका :- वेदिका जयदीप लिमये
शब्द:- डॉ. सदानंद अरुण चावरे
No comments:
Post a Comment