*शुभ दीपावली*
कुणी लाविता प्रकाश पणती,ज्योत उजळी चराचरासी
अंधाराचे धुके हटवुनी,उत्साहाचे तुषार विखरी.
थेंब स्नेहाचे चार सुगंधित,तनु मनाला निवांत सुखवी
आनंदाचा मंगल परिमळ,आसमंती मुक्त दरवळी.
नात्यांची नाजुक गुंफण ,निरांजनातून स्निग्ध तेवली
शुभेच्छा देण्या घेण्यासाठी, सहज घडती भेटी गाठी.
येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे,सुख समृद्धीचे व अधिक आरोग्यदायी लाभो ही शुभेच्छा.
डॉ सदानंद ,डॉ. शुभदा , कल्याणी चावरे.