Monday, March 1, 2021

लोभस हिरवा पर्णभार....

लोभस हिरवा पर्णभार....


लोभस हिरवा पर्णभार हा,
प्रफुल्लित करितो मनामनाला.

नसे उमलले फूल त्यावरी,
आत्ममग्न हा भासे मजला.

पार्श्वभूमी विशेष निवडुनी,
उठाव चित्रा खास लाभला.

असो चित्र वा पारदर्शिका,
सौंदर्याचा परिपोष जाहला.

सृजनशील दृष्टीला त्या,
दाद द्यावीशी वाटे मजला.

पारदर्शिका:- जयदीप लिमये
शब्द:- सदानंद चावरे
२८-२- २०२१

No comments:

Post a Comment