Monday, March 1, 2021

छेदलेल्या फांदीलाही

छेदलेल्या फांदीलाही...

छेदलेल्या फादीलाहि,निर्मितीचा मोह होतो,
कोंब हिरवा सानुलासा,अवचित उभवून येतो.

निबर जरासे खोड,थोडे ओलेते होते,
सृजनाचे गीत नवेले, अलगद अंकुरित होते.

गळाठलेल्या मनांनीही,जरा प्रफुल्लित व्हावे,
शहाणपण थोडे सृष्टिकडुनी ,जरा उसने घ्यावे.

पारदर्शिका :- जयदीप लिमये
शब्द:- सदानंद चावरे
२८-२-२०२१


No comments:

Post a Comment