Wednesday, April 28, 2021

धाव रे धाव आता

धाव रे धाव आता...

धाव रे धाव आता
धाव दीनानाथा
प्राण अवरोधिले
वायू संचिला संपला.

अग्नी प्रलये आता
जीव देही कोंडला
विषाणू चे थैमान
समाज सारा गांजला.

जिवलग मित्रही
निरोप घेऊ लागला
तव कृपेचा मेघ
असा कसा आटला.

असेल जर का
पुण्य किंचितही साठले
खर्चुन टाकी सर्व रे
प्रलय आता थांबवा.

धाव रे धाव आता
धाव दीनानाथा
वर्षुनी दया माया
विश्व आता वाचवा.

सदानंद

No comments:

Post a Comment