Sunday, February 14, 2021

सुदूर नभीचे

दूर नभांगणीचे,सूर वेधितो मी
पुष्पकोशी लपलेले,मधुकण वेचितो मी.

क्षितीजाच्या पल्याडचे,गूढ पाहतो मी,
तेजाळल्या नभाचे,रविबिंब जोखतो मी.

ठहराव मज देते,फांदी लहानशी ही,
आभाळ गर्द गहिरे,पंखी तोलतो मी.

डॉ सदानंद चावरे
१५-२-२०२१

No comments:

Post a Comment