जळ अथांग पसरले,वेढून मजला घेतले,
जीवन सरितेचे जल,प्राशनासी लाभले.
जीवनाचे हिरवे कोंभ,माथ्यावरी सांभाळिले,
गळाभर पाण्यात नित्य,तप चिरंतन चालले.
उभा पाठीसी कधीचा,नग निश्चल उंचसा,
वागवितो अंगभर,चैतन्याच्या खाणाखुणा.
उंच स्वच्छंद निळाई ,आभाळ तेज खुलविते,
लेऊन आभाळ रंग,जल आकाश रंगी जाहले.
निस्तब्ध शांत एकांत हा,मम मनास तोषवी,
जीवन रंगी रंगताना,जणू अलिप्त होणे शिकवी.
© डॉ सदानंद चावरे
७-१२-२०२०
No comments:
Post a Comment