Sunday, December 20, 2020

अभ्यास करणे

वाद... प्रतिवाद.. संवाद.

विचारे आकळे विचार
आचारें बिंबतो विचार
संवादे सुधारे विचार

विचारी आदळे विचार
नाद करित घडे वाद
संघर्ष पेरितो वाद

विचारा झोंबतो विचार
सुस्पष्ट बनतो विचार
विचारा आदरी विचार

विचार विचारा आव्हान
सुविहीत सृजनशील साकार
प्रतिवादे सुधारे वाद

सुजनीं खेळता विचार
प्रतिवाद खंडितो विचार
झुळझुळता झरा संवाद

सदानंद.

वाद.. प्रतिवाद .. संवाद

वाद... प्रतिवाद.. संवाद.

विचारे आकळे विचार
आचारें बिंबतो विचार
संवादे सुधारे विचार

विचारी आदळे विचार
नाद करित घडे वाद
संघर्ष पेरितो वाद

विचारा झोंबतो विचार
सुस्पष्ट बनतो विचार
विचारा आदरी विचार

विचार विचारा आव्हान
सुविहीत सृजनशील साकार
प्रतिवादे सुधारे वाद

सुजनीं खेळता विचार
प्रतिवाद खंडितो विचार
झुळझुळता झरा संवाद

वाद... प्रतिवाद.. संवाद.

विचारे आकळे विचार
आचारें बिंबतो विचार
संवादे सुधारे विचार

विचारी आदळे विचार
नाद करित घडे वाद
संघर्ष पेरितो वाद

विचारा झोंबतो विचार
सुस्पष्ट बनतो विचार
विचारा आदरी विचार

विचार विचारा आव्हान
सुविहीत सृजनशील साकार
प्रतिवादे सुधारे वाद

सुजनीं खेळता विचार
प्रतिवाद खंडितो विचार
झुळझुळता झरा संवाद

घडावे विचार मंथन
टिकावा आदर सन्मान
न घडावा कधी अपमान

सदानंद.

सदानंद.

Monday, December 14, 2020

पाऊल वाट

पाऊलवाट...

पिकल्या पानांची पाऊलवाट
सोनसळी रंगाची अनोखी बरसात.

ऊन साउलीची मिळे नित्य साथ
रंग सरत्या वाटेलाही पावलांची आस .

प्रखर गहिरे कधी कुंद भासणारे
क्षण सोनेरी कधी अंधार ल्याले .

वाट एकाकी अशीही हरवून सापडणारी
शोध घेता कुणाचा अंतरंगी गवसणारी.

एकट्याला पुरेशी लहानशी वाट
सोबतीला हृदयातील फक्त एक वेणूनाद.

सदानंद.


Painting by Italian artist Giovanni Fattori (1825-1908

Sunday, December 13, 2020

लाटा

लाटा...
उसळती फेसाळती आदळती लाटा
निस्तब्ध खडकांना झिजवती लाटा. 
रोरावती झेपावती खळाळती लाटा
गाज अंतर्यामी घोंगावती लाटा.
गरजती बरसती आक्रमती लाटा
धरणीला आवेगाने भेट देती लाटा.

डॉ सदानंद चावरे
१४-१२-२०२०

Tuesday, December 8, 2020

वृक्ष एकाकी..


जळ अथांग पसरले,वेढून मजला घेतले,
जीवन सरितेचे जल,प्राशनासी लाभले.

जीवनाचे हिरवे कोंभ,माथ्यावरी सांभाळिले,
गळाभर पाण्यात नित्य,तप चिरंतन चालले.

उभा पाठीसी कधीचा,नग निश्चल उंचसा,
वागवितो अंगभर,चैतन्याच्या खाणाखुणा.

उंच स्वच्छंद निळाई ,आभाळ तेज खुलविते,
लेऊन आभाळ रंग,जल आकाश रंगी जाहले.

निस्तब्ध शांत एकांत हा,मम मनास तोषवी,
जीवन रंगी रंगताना,जणू अलिप्त होणे शिकवी.

© डॉ सदानंद चावरे
७-१२-२०२०

बिंब तेजाचे..

बिंब तेजाचे...

बिंब तेजाचे सोनेरी,आकाशी प्रकटले,
जणू उषेच्या अंगणी, चैतन्य पालावले.

ढग थोडेसे दाटुनी,प्रकाश किरणे विखुरली,
नदीच्या शांत प्रवाही,प्रकाश पहाट उतरली.

निजलेली झाडे तीरावर,जाग येऊ लागली,
डोकावुनी जळात बघता,प्रतिबिंबे सुखावली.

गूढ प्रसन्न काहीसे ,गगनात अवतरले,
सकाळचे भारलेले,क्षण सोनेरी जाहले.
© डॉ सदानंद चावरे
७-१२-२०२०

Friday, December 4, 2020

Study... अभ्यास

अभ्यास.....

ॐ अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥९ ॥(१२ अध्याय)


यदि तू मनको मुझमें स्थिररुप से स्थापन करनेमें असमर्थ है, तो हे अर्जुन ! अभ्यासयोग द्वारा मुझे प्राप्त होनेकी इच्छा कर । ॐ ॐ ॐ


प्रस्तुत  श्र्लोक अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यात घडलेल्या संवादातील एक महत्त्वाचा विचार मांडतो.यात एखादं लक्ष, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय काय गरजेचे आहे ?

मन मुळातच चंचल आहे. लक्षप्राप्तीसाठी त्याचे ' ध्यान' एक केंद्री होणे, लक्षा वर स्थिर होणे गरजेचे आहे. त्याशिवाय मानसिक क्षमता व ऊर्जा पूर्णांशाने एकवटणार नाहीत. पण हे कसे घडावे?
अभ्यासयोग हा एक वेगळा शब्द समजावून घेणे क्रमप्राप्त आहे.अभ्यासाला योगाचा दर्जा दिला आहे.

“बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्”।।इति।।२/५० गीता

प्रत्येक काम कौशल्य पूर्ण करणे ही योगाची व्याख्या गीतेतील दुस-या अध्यायात आली आहे.

म्हणजेच अभ्यास ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे.जे ध्येय ठरवले असेल ते जर परिपूर्ण करायचे असेल तर त्यात पूर्णांशाने आपले चित्त असले पाहिजे.

मन एकाग्र करण्याचा अभ्यास असेही योगा बाबत म्हणता येईल.
तसेच मनाला स्थिर करण्यासाठी अभ्यासाची जरुरी आहे.

एकतर अभ्यास प्रामाणिकपणे करायला हवा.
स्वत:शी अत्यंत प्रामाणिक पणे करायला हवा.
लक्ष निश्चित करायला हवे.

अभ्यास ही प्रक्रिया आहे. उद्दिष्टाशी समरसता असेल ,दिशा सुस्पष्ट असेल तर हा प्रवास आनंददायी होईल.एखादी गोष्ट करताना आतून समाधान होत असेल तर कष्ट करायची तयारी टिकून रहाते व अडचणींचा सामना करीत पुढे जाणे,एक एक टप्पा गाठत जाणे सातत्याने होत रहाते.

या मार्गावर टिकून रहाताना आपल्या प्रयत्नां इतकेच मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.अध्यात्म क्षेत्रात सद्गुरुंचे महत्त्व आहे.भौतिक गोष्टींमधे , नित्य व्यवहारात देखील मार्गदर्शक महत्त्वाचा असतो.तो कधी शिक्षकांच्या रूपात असेल,कधी वरिष्ठ ज्ञानी व्यक्ती स्वरूपात असेल किंवा वडीलधारी व्यक्ती स्वरुपात असेल.तर कधी ग्रंथ रुपात ही असेल.

मुळात मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण तो अधिकार मान्य केला पाहिजे.विनम्र वृत्तीने वागले पाहिजे.जो सल्ला मिळाला तो कृतज्ञ भावनेने स्वीकारून वर्तनात सुयोग्य बदल केला पाहिजे.अनुभवाच्या कसोटीवर तपासून बघितला पाहिजे.पण केवळ तर्कदुष्ट विचार करीत राहिले तर वरील साखळी--- विचार ग्रहण करण्याची --- स्विकारून अंमलात आणणे--- व नंतर अनुभवांती अनुमान बांधणे... ही घडणार नाही.

वाक्पटुत्व येईलही व केवळ बुद्धी बळावर आपण कदाचित मुद्दे खोडून काढण्यात तरबेज ही होऊ.
पण शिकणे... अभ्यास...व स्वत:त उत्तरोत्तर सुधारणा ही प्रक्रिया राहून जाईल.

डॉ सदानंद चावरे
५-१२-२०२०


Tuesday, December 1, 2020

mirror..आरसा..

आरसा...

आरसा असतोच एक आभास,
आपलंच प्रतिबिंब दाखवणारा.
आरसा असतो एक समतल पटल,
लांबी रुंदी खोली काहीच नसणारा.

आरसा असतो नितळ स्वच्छ पारदर्शी,
जे जसं असतं तसंच दर्शवणारा.
आरसा असतो खूपसा प्रामाणिक
हातचं काही न राखणारा ,काही न घालणारा.

चेह-यावरचा आनंद, ताण दाखवताना
स्वत: अलिप्त निर्लेप मोकळा रहाणारा.
खूप प्रतिमा येत जात असतानाही 
प्रत्येक प्रतिमेशी तितकाच एकरूप होणारा.

आरशाला नसतो भूतकाळ अन् भविष्यकाळही
आरसा असतो अखंड वर्तमानात जगणारा.
एक साधी काच तिला पारा लावलेला,अपारदर्शक बनलेला
इतरांना संपूर्ण पारदर्शकता शिकवणारा ...आरसा.

बहिरंगाचे यथार्थ दर्शन नित्य घडवणारा,
डोकावणा-या प्रत्येकाला सावध करणारा.
तरीही कुठं तरी काहीतरी निसटून जातंय,
शोधतोय मी ..अंतरंगही दाखवणारा एक ... आरसा.

डॉ सदानंद चावरे
३०-११-२०२०

mirror..आरसा..

आरसा...

आरसा असतोच एक आभास,
आपलंच प्रतिबिंब दाखवणारा.
आरसा असतो एक समतल पटल,
लांबी रुंदी खोली काहीच नसणारा.

आरसा असतो नितळ स्वच्छ पारदर्शी,
जे जसं असतं तसंच दर्शवणारा.
आरसा असतो खूपसा प्रामाणिक
हातचं काही न राखणारा ,काही न घालणारा.

चेह-यावरचा आनंद, ताण दाखवताना
स्वत: अलिप्त निर्लेप मोकळा रहाणारा.
खूप प्रतिमा येत जात असतानाही 
प्रत्येक प्रतिमेशी तितकाच एकरूप होणारा.

आरशाला नसतो भूतकाळ अन् भविष्यकाळही
आरसा असतो अखंड वर्तमानात जगणारा.
एक साधी काच तिला पारा लावलेला,अपारदर्शक बनलेला
इतरांना संपूर्ण पारदर्शकता शिकवणारा ...आरसा.

बहिरंगाचे यथार्थ दर्शन नित्य घडवणारा,
डोकावणा-या प्रत्येकाला सावध करणारा.
तरीही कुठं तरी काहीतरी निसटून जातंय,
शोधतोय मी ..अंतरंगही दाखवणारा एक ... आरसा.

डॉ सदानंद चावरे
३०-११-२०२०