ओहोटी...
सूर्य बिंब क्षितीजावरचे
प्रकाश रेषा खुलून दिसे
जळात उतरले रंग उषेचे
तेज मिसळुनी चमचमते
पुळणी वरची ओली माती
स्मृती कशाची जपत असे
येऊन गेली लाट मघाशी
ओले पण ते मनी जपे
संधीकालचे अर्घ्य देत
रिक्त किनारा शांत दिसे
पोटामधली खळबळ विसरुन
गूढ स्तब्धता उगी असे
चिंतन करितो कुणी अनामिक
मनी तयाच्या काय स्फुरे
ॐ काराची गाज ऐकतो
निसर्ग सारा मज भासे
© डॉ सदानंद चावरे
७-१०-२०२०
No comments:
Post a Comment