Monday, October 12, 2020

दान अक्षरांचे

दान अक्षरांचे...

दान अक्षरांचे 
ओंजळीत घेऊन आलो
समजून अक्षरे फुलांना
अर्पीत मी निघालो

पूजा अक्षराची
शब्दांतुनी बांधतो
तरंग भावनांचे
हलकेच मी वेचितो

सुहृदांस वाटतो
आनंद काव्य पंक्ती
भावते जे मनाला
शब्दात मी मांडतो

क्षण दोन क्षणांचे
आनंद गान व्हावे
रिझवून रसिक मनाला
शांत करीत जावे

अर्घ्यही फुलांचे
शब्द गंगेत न्हावे
मिसळुनी जलाशी
विरघळून मी जावे

सदानंद चावरे
१३-१०-२०२०





No comments:

Post a Comment