मधु मुरलीच्या मुग्ध स्वरांनी,राधा हरीचे सगुण संकीर्तन,
जीवा शिवाचे अतूट नाते,मनी स्मरावे सतत निरंजन.
सृष्टीचे जे अमूर्त नर्तन,लय तालांचे अमृत मंथन,
सप्तसुरांची एक बासरी,अविरत प्रकटे एकच गायन.
मूर्ती दडले अमूर्त चिरंतन,व्हावे आम्हा थोडे आकलन,
चित्रा मधले भाव निरखता,हातून घडले थोडे लेखन.
सदानंद चावरे.
राधा, मुरली, मोरपीस आणि श्रीकृष्ण सर्व एकच
ReplyDelete