त्रीदल...
पुष्पा सम दिसते त्रीदल सुंदर,
हिरवाई लेवून दिसे अनुपम मोहक.
जीवन रेखा ज्या फुटती देठातून,
चैतन्य तजेला त्या राखिती सांभाळून.
प्रकाश संचय संश्लेषण संचालन,
अनामिक कोण करतसे वृत्तीचे पालन.
शास्त्र उलगडे गुह्य निसर्गाचे कूट,
मोहविते मनास आपुल्या इवलेसे त्रीदल.
परदर्शिका :- जयदीप लिमये
शब्द :- सदानंद चावरे
No comments:
Post a Comment