Thursday, November 18, 2021

चंद्र नभीचा

दूर नभाच्या अंगणी,दिसे चांदवा गोल,
डोकावून पाहतसे ,धरणीचे कौतुक.

सांज आलीसे दाटून,पाखरे बैसली निवांत,
 कोण्या सज्जात रेंगाळे,दिवाळीची आठवण.

सारे धूसर धूसर,धरित्रीच्या अंगणात,
धूम्र लपेटून घेई,सारा आसमंत.

वाटे मंदावली नजर,भेटी आला दृष्टीदोष,
कोणी मजला द्यावा ,भल्या डॉक्टरचा फोन.

पॅथी कोणतीही असो,हवा मला उपचार,
नेत्राच्याही मागे मनुजा,वृत्तीचा आजार.

ठाऊक आहेत आम्हासी, किती तरी कीर्तीवंत,
भले कोणासी म्हणावे, एवढाच कूट प्रश्न.

पारदर्शिका:- पराग अभ्यंकर
शब्द:- डॉ सदानंद चावरे
१९-११-२०२१

Monday, November 15, 2021

tridal

त्रीदल...

पुष्पा सम  दिसते  त्रीदल सुंदर,
हिरवाई लेवून दिसे अनुपम मोहक.

जीवन रेखा ज्या फुटती देठातून,
चैतन्य तजेला त्या राखिती सांभाळून.

प्रकाश संचय संश्लेषण संचालन,
अनामिक कोण करतसे वृत्तीचे पालन.

शास्त्र उलगडे  गुह्य निसर्गाचे कूट,
मोहविते मनास आपुल्या  इवलेसे त्रीदल.


परदर्शिका :- जयदीप लिमये
शब्द :- सदानंद चावरे

१६-११-२०२१