Tuesday, January 5, 2021

कुंपण

सरणारे प्रत्येक वर्ष...

सरणारे प्रत्येक वर्ष..
घेऊन जाते काही आठवणी.. काही गहिरे क्षण.

वर्षाचा शेवटचा दिवस...
घेऊन येतो निरोपाचे हळवे... कातर सूर.

काही गमावलेलं ..तर काही गवसलेलं ..
सारंच मनात दाटून येतं... भिरभिरत रहातं.

हातातून निसटून जाणारे क्षण...
सरसर निसटत जातात....ओंजळीतल्या वाळूसारखे.

रित्या होणा-या ओंजळीत भरत असते..
एक अथांग पोकळी..... काही आश्वासक स्वप्न.

डॉ सदानंद चावरे.
३१-१२-२०२०

No comments:

Post a Comment