ये क्षितिजावर रविबिंब उसळुनी
तम धुक्याचे पटल सारुनी
गगनी रसरंग उधळुनी
रविकर दे अभय विश्वासी.
जाणतो की अजाण तोही
उगवणे नित्य असे जरी
वर्ष पालटे आजच्या दिनी
प्रभा आजची असे निराळी.
सरसावुन कॅमेरा कोणी
अलगद पकडी क्षण सोनेरी
अर्थ लाभतो सकल कृतींना
हातामागील हृदयच भारी.
No comments:
Post a Comment