|| श्रीराम||
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.
जग अस्वस्थ असताना आपण शांततेसाठी प्रार्थना करूया.
शांति स्तवन....
शांततेला विवेके आम्हीच जोपासायचे
माणसाने माणसाला नित्य सांभाळायचे||१||
जाहली युद्धे किती तांडव का आरंभिले|
संस्कृती साहित्य सारे क्षणात विध्वंसिले||२||
मानवाने दानवापरी संहारक का व्हायचे
आपुलेचि कर्तृत्व स्वहस्ते का जाळायचे||३||
आजवरीच्या संघर्षांनी काय हित साधले
युद्ध नाही विकल्प ,आम्हां नाही समजले ||४||
स्वार्थ निज साधण्या नृशंस सरसावले
सौंदर्य मांगल्यासी मृत्यूमुखी स्वहस्ते ढकलिले ||५||
शांततेला प्रथमत्व गोविंदे सदैव दिले
रण विकल्प अखेरचा असेच प्रतिपादिले ||६||
बोध संतांनी दिला त्यास मनीं आठवायचे
स्थापिण्या विश्व शांती भारतें पुढे सरसावयाचे || ७||
डॉ सदानंद चावरे पुणे
१९-०३-२०२६
नववर्षारंभाच्या आपणांस मन:पूर्वक शुभेच्छा.
|| जय जय रघुवीर समर्थ||
No comments:
Post a Comment