Thursday, April 4, 2024

मी... मतदार...

मी.... मतदार....

नेमेची येतो परीक्षेचा क्षण
सक्रीय होते प्रचाराचे आवर्तन.
आणाभाका आणि आश्वासन
उत्साहाने पंचवार्षिक उद्यापन.

लोकशाही मागते दान
विवेकाने करावे मतदान.
विचारधारा अन् आदर्श
नेतृत्वही घ्यावे पारखून.

भविष्य आणि वर्तमान
द्यायचे समर्थ सशक्त हाती.
संगतवार सारे सारे तपासून
कृती व शब्द नीट जोखून.

नको मला शब्द भुलावण
असावा देश कृतिप्रवण.
हवी शक्ती युक्ती बुद्धी
देवा धर्माचे अधिष्ठान.

भरपूर घडावे विचार मंथन
जबाबदारीने कर्तव्य पालन.
नको निराश हतबल मन
कर्तव्य टाळून दूर पलायन.

ज्यांच्या प्रती वाटे विश्वास
मत माझे देणार खास.
माझे मत माझा अधिकार
जाऊन थाटात मी बजावणार.


डॉ सदानंद चावरे पुणे.
४-४-२०२४

2 comments: