प्रभु रामाचे झाले मंदिर
पावन पवित्र अवसर
भरेल आता नित्य दरबार
भक्तांचा वाढता वावर.
मनीं भाव परम पवित्र
स्वप्न हिंदू मनांचे पूर्ण
शतकांचे निमाले शल्य
तेजाने भरले गर्भगृह.
उत्कट उत्साही मन्मन
राष्ट्र अवघे जनमन
आशीर्वादे उद्धरावे
प्रार्थना त्या रघुवरास.
सुरू व्हावा नवा प्रवास
ओज तेज सहिष्णू धैर्य
सहस्र वर्षांची शहाणीव
यावी निज तेजे उजळून.
डॉ सदानंद चावरे पुणे.
२२-१-२०२४
No comments:
Post a Comment