आता अमृताची वेळ...
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेताना,संत तुकाराम महाराज वैकुंठी जात असताना ,त्यांची भावावस्था काय असू शकेल त्याचा मागोवा.
टिळा लागला भाळावर,
आता अमृताचि वेळ
रत्नजडित हरीचे मुख
दिसो लागले आम्हास..( आता अमृताची वेळ)
सोहं शब्द कानी आला
विठू नयनी दाटला
अवघा आनंद सोहळा
भरूनी उरला अंतरंग..( आता अमृताची )
स्मित उमलून आले
रत्न तेज फिकुटले
ध्यान देवाचे लागले
द्यावा निरोप आम्हास...(आता अमृताची वेळ)
No comments:
Post a Comment