Thursday, November 23, 2023

इवलासा मी...

एवढ्या मोठ्या तळ्यात
इवलासा मी
डोकावून जरा पहातो
दिसतो कसा.

माझा डौल माझे रंग
सजलेला मी
प्रतिमा माझी पहातो
आहे कसा.

नितळ पाण्याच्या तळात
हलते काही
नजर स्थिरावून वेध
घेतो जरासा.

वर अथांग आकाश 
मी एकाकी
चोहीकडे भरले जळ
शोध अस्तित्वाचा.

सदानंद चावरे