Friday, March 10, 2023

मागे वळून पहाताना...

वळुन पाहतो मी
आसमंत सारा
लाभला जेथ मजला
क्षणाचा निवारा

कृतार्थ भाव ऐसा
मनी उगवला
जीवनाचा अवघा
उत्सव की मांडला.

रंग त्यात भरता
ईश स्वहस्ते
खूश त्या करावे
उधळून रंग सारा.
फोटो:- जयदीप लिमये 
सदानंद
११-३-२०२३

झेप

घ्यायची इथून झेप
ना इथे परतायचे
निरखून नीट पाहून
पंख मला पसरायचे.

दिला आधार मजला
क्षण एक विसावा
कृतार्थ मी हे जणु
वाकुनी सांगायचे.

जीव इवलासा
रंग रंगली मेहेफिल
टिपुनी सूर स्वर सारे
गगनी मुक्त विहरायचे.

फोटो :- जयदीप लिमये 
सदानंद.
१०-३-२०२३