Tuesday, July 13, 2021

Bramha Kamal

ब्रह्म कमळ....

रात्रीचा पहिला प्रहर
कळी येते अलगद उमलून
मंद सुगंध दरवळ सुंदर.

शुभ्र विमल पुष्पदल
सृजनाचे रूप मनोहर
पावित्र्याची होते पखरण.

कमळ ब्रह्माचे आसन 
सहस्रार ज्ञानाचे विकसन
पूर्णत्वास जाई साधन.

सदानंद.
फोटो सौजन्य :- राहुल लाळे.