Friday, June 25, 2021

राधा कृष्ण

राधा कृष्ण...

राधा कृष्णाचे मैतर
द्वैत म्हणू की अद्वैत
हृदयाच्या आरशात
दिसे एकच चित्तर

पावा वाजवी कान्हा
सूर राधेचा लागला
ऐकून अपूर्व गान
गाभा विश्वाचा तोषला

राधा दूर गोकुळात
कृष्ण द्वारकेचा राव
राण्यांनाही ऐकू आले
राधा कृष्णाचे स्पंदन

दोन जीव एक प्राण
भक्तीचे अनोखे संगीत
जीवा शिवाचे अपूर्व
अनोखे मीलन

© डॉ सदानंद चावरे
२५-७-२०२०

Saturday, June 12, 2021

गजानन

शांतपणे विसावलेले,जणू आपलेच आप्त
न्याहाळिती आपले,कौतुके व्यवहार.

आसनी बैसले ,होऊनी निवांत
मुखावर विलसते,अपूर्व समाधान.

आशीर्वाद देण्या,जरा उचलिला हात
नेत्रा तून बरसती,शांत करुणाघन.

सदानंद चावरे
११-६-२०२१
( फोटो सौजन्य :- श्री. आनंद देवधर ,पेण)